Early Life & Cultural Roots

1961 - Origins

Pt. Rajendra Kulkarni was born in 1961 in the culturally vibrant city of Belgaum. He hails from a family deeply rooted in art, where music was lived, not just practiced. His father, Shri Bhagawantarao (Balasaheb Kulkarni – Bedakihalkar), was a respected radio artist and accomplished flautist and violinist, creating a fertile ground for artistic growth.

प्रारंभिक जीवन आणि सांस्कृतिक वारसा

१९६१ - उगम

पं. राजेंद्र कुलकर्णी यांचा जन्म १९६१ मध्ये बेळगाव या सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहरात झाला. त्यांचे वडील, श्री भगवंतराव (बाळासाहेब कुलकर्णी - बेडकीहाळकर), हे आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकार आणि उत्कृष्ट बांसुरी व व्हायोलिन वादक होते. घरातच संगीताचे संस्कार मिळाल्याने त्यांच्या कलात्मक जडणघडणीचा पाया पक्का झाला.

First Notes

Age 6

Rajendraji developed a keen interest in the Bansuri at the tender age of six. Surrounded by music at home and inspired by the sounds of classical ragas, his connection with the flute grew naturally and deeply from early childhood.

बांसुरीची पहिली साद

वयाच्या ६ व्या वर्षी

अवघ्या सहाव्या वर्षी राजेंद्रजींना बांसुरीची ओढ लागली. घरात सतत वावरणाऱ्या सुरांमुळे आणि शास्त्रीय रागांच्या संस्कारांमुळे बांसुरीशी त्यांचे नाते बालपणीच दृढ झाले.

The Defining Choice

Education vs Passion

He excelled academically, securing 90% in his 12th standard exams. Although he initially secured admission for Engineering, he realized his true calling was elsewhere. In a bold move, he chose a Bachelor of Science (B.Sc) to dedicate more time to music. He stood 2nd in college and was honoured as "Best Student of the Year."

जीवनाला कलाटणी देणारा निर्णय

शिक्षण आणि ध्येय

१२ वीच्या परीक्षेत ९०% गुण मिळवूनही त्यांनी इंजिनिअरिंगचा मार्ग नाकारला. संगीतासाठी पुरेसा वेळ देता यावा म्हणून त्यांनी B.Sc ला प्रवेश घेतला आणि त्यातही महाविद्यालयात दुसरा क्रमांक पटकावत 'Best Student of the Year' चा बहुमान मिळवला.

Balance & Responsibility

1988 Onwards

In 1988, he joined the State Bank of India, balancing a professional career with his musical sadhana. He married Manjiri in 1989, and they have two daughters, Madhuwanti and Shalmali. The family continues the artistic legacy with strong inclinations towards performing arts.

समतोल आणि जबाबदारी

१९८८ पासून पुढे

१९८८ मध्ये त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी स्वीकारली आणि नोकरी सांभाळून आपली संगीत साधना अविरत चालू ठेवली. १९८९ मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यांच्या पत्नी मंजिरी आणि मुली मधुवंती व शालमली असा त्यांचा परिवार असून, घरात कलेचा वारसा आजही जपला जात आहे.